Manasvi Choudhary
नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या महिन्यात अनेकजण बाहेर फिरण्याचा प्लान करतात. तुम्ही देखील गोव्याला मित्रमैत्रिणीसोबत फिरण्याचा प्लान करत असाल तर या बेस्ट ठिकाणांना भेट द्या.
गोव्याला पर्यटक नाईट लाईफ एन्जॉय करण्यासाठी येतात. तर तुम्हाला देखील गोव्यात नाईटला एन्जॉय करायचा असल्यास प्रसिद्ध नाईट क्लबबद्दल जाणून घेऊयात.
गोव्यात प्रसिद्ध क्लब क्युबाना या गोवा इव्हेंट्सला नक्की भेट द्या अंजुनाजवळ असलेला हा क्लब गोवा नाईटलाईफसाठी प्रसिद्ध आहे
क्लब टिटोज गोवा हे देखील गोव्यातील नाईट एन्जॉय करण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. टिटोज क्लब उत्तर गोव्यात बागा बीचजवळ आहे. हा क्लब रात्री साडेनऊ ते पहाटे साडेतीन वाजेपर्यंत सुरू असतो.
टागापोर्ट येथे असलेला SinQ नाईट क्लब हा देखील गोव्यातील प्रसिद्ध क्लब आहे. संगीत आणि शांत वातावरणासाठी हा ओळखला जातो.