Sakshi Sunil Jadhav
देशात सध्या विकास होताना आपल्याला पाहायला मिळत आहे.
मात्र एक राज्य असे आहे. जिथे तुम्हाला रेल्वे स्टेशनने प्रवास करता येत नाही.
सिक्कीम हे भारतातील एकमेव राज्य आहे जिथे अजूनही रेल्वे स्टेशन नाही.
येत्या काही दिवसात सिक्कीम येथे रेल्वे स्टेशन बांधण्यात येणार आहे.
ईशान्य भारतातील डोंगराळ राज्य असणारे सिक्कीम भूतान आणि नेपाळने वेढले आहे.
सिक्कीमचा भाग हा पर्यावरण संरक्षणाचा आणि भूस्खलन असलेला आहे.
त्यामुळे तेथे रेल्वे स्टेशन बांधल्यास पर्यावरणाला हानी पोहोचू शकते.