Sakshi Sunil Jadhav
महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणानुसार नाश्त्याचे पदार्थ बदलत असतात.
आज आपण कोकणपट्ट्यातील नाश्त्याला खाल्ला जाणारी सगळ्यात फेमस अन् प्रसिद्ध डीश पाहणार आहोत.
तांदळाचे पीठ, लसूण पाकळ्या, चिरलेली कोथिंबीर, मिरची पेस्ट, चवीनुसार मीठ, दही, जिरं, तूप.
लसुण, कोथिंबीरीचे एकत्र वाटण करून घ्या.
आता तूप सोडून सगळे साहित्य एकत्र करा. त्यात लसणाची पेस्ट मिक्स करा.
आता तवा गरम करा. घावण्यांचे पीठ जरा पाण्यासारखे करा.
१ कप पीठ आता गरम तव्यावर ठेवा. ते सुकल्यावर त्यावर झाकण ठेवा.
२ मिनिटांनी घावण्यांवर तूप घालून ते पुन्हा शेकवा.
पुढे गरमा गरम आणि मऊलुसलुशीत घावणे खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.