Surabhi Jayashree Jagdish
छत्रपती शिवाजी महाराज मोहिमेवर असताना केळी खात असत असा उल्लेख उपलब्ध संदर्भांमध्ये आढळतो. मोहिमेच्या काळात सहज नेता येणारं आणि वेगळ्या तयारीची आवश्यकता नसलेलं अन्न अधिक सोयीचं ठरत असे.
लष्करी मोहिमांमध्ये दीर्घ प्रवास आणि मर्यादित साधने यांचा विचार करावा लागत असे. अशा परिस्थितीत केळीसाठी स्वयंपाक किंवा विशेष प्रक्रिया आवश्यक नसल्याने ते खाण्यास सोयीचे होतं. मोहिमांदरम्यान महाराजांसोबत तसेच सैन्यातील मावळ्यांसाठीही केळी उपलब्ध करून दिली जात असल्याचा उल्लेख आहे.
केळ्यामध्ये कार्बोहायड्रेट, नैसर्गिक साखर आणि पोटॅशियम यांसारखे पोषक घटक असतात. त्यामुळे शारीरिक श्रमाच्या काळात ते सहज खाता येणारे ऊर्जादायी फळ ठरायचं.
उपलब्ध संदर्भांमध्ये त्यांच्या आहारात ज्वारी, बाजरी आणि नाचणीच्या भाकरींचा उल्लेख केला आहे. दूध, दही, लोणी आणि तूप यांचाही आहारात समावेश असल्याचे नमूद केलंय. त्यामुळे मोहिमेतील आहाराची रचना केवळ केळी किंवा इतर फळांवर आधारित होती, असं मानता येत नाही.
दक्षिणेकडील मोहिमांमध्ये केळीचे कंद उपलब्ध झाल्याचा उल्लेख काही मराठी लेखांमध्ये केलाय. हे कंद विविध भागांतील सरदार आणि मावळ्यांकडे देण्यात आल्याची माहिती त्यात नमूद आहे. पुढे रावेर, जामनेर आणि शेंदूर्णी परिसरात केळीची लागवड सुरू झाल्याची परंपरागत माहितीही दिली जाते.
खानदेशातील काळी आणि सुपीक जमीन तसंच तापी, पूर्णा आणि गिरणा नदीखोऱ्यांचा परिसर केळीच्या लागवडीस पोषक ठरला. मराठा काळात या भागात केळीच्या लागवडीचा प्रसार झाल्याची माहिती काही संदर्भांमध्ये देण्यात आलीये.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैनंदिन आहाराची संपूर्ण आणि अधिकृत नोंद आज उपलब्ध नाही. त्यामुळे केळी खाण्याबाबतचे उल्लेख कोणत्या स्वरूपाच्या ऐतिहासिक किंवा परंपरागत स्रोतांवर आधारित आहेत.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. त्याचे संदर्भ देण्यात आले असून आम्ही त्याची खातरजमा करत नाही