ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मासिक पाळीदरम्यान शरीरातील हार्मोन्समध्ये बदल होणे, मूड स्विंग्स होणे, पोट दुखणे यासारख्या समस्या सामान्य असतात.
अशावेळी, आपण काय खातो याचा परिणाम शरीरावर होतो. म्हणून मासिक पाळीमध्ये कोणत्या गोष्टी खाऊ नये, जाणून घ्या.
जास्त मीठ असलेले पदार्थ खाऊ नये. यामुळे शरीरात ब्लोटिंग वाढते.
चहा, कॉफी आणि एनर्जी ड्रिंक्समध्ये कॅफीन असते, या पेयांचे सेवन केल्याने झोप न येणे आणि एंग्झायटीची समस्या होऊ शकते.
मासिक पाळीदरम्यान अजिबात जंक फूड खाऊ नका. यामध्ये ट्रान्स फॅट असते, ज्यामुळे अवयवांना सूज येते.
प्रोसेस्ड फूड, पॅकेज्ड फूड आणि इंस्टंट नूडल्ससारख्या पदार्थांमध्ये प्रिजरव्हेटिव्ह असतात. ज्यामुळे शरीरातील हार्मोन्स असंतुलित होतात.
मासिक पाळीदरम्यान जास्त मसालेदार पदार्थ खाणं टाळा. यामुळे अॅसिडिटी, गॅस आणि ब्लोटिंग सारख्या समस्या होऊ शकतात.