ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकजण आपल्या प्रगतीसाठी जपमाळ जपतात.
जर तुम्ही नियमांनुसार मंत्राचा जप केला तर जीवनात खूप यश मिळते.
तुळशीची माळ, रुद्राक्षाची माळ अनेकजण जपतात.
हिंदू धर्मग्रथांनुसार जपमाळ जपताना चुकूनही तर्जनीचा वापर करु नये.
तर्जनी हे अहंकाराचे बोट आहे. अहंकाराचा त्याग करणे हा या जपाचा उद्देश आहे. त्यामुळे तर्जनी कधीच वापरु नये.
तर्जनीचा वापर करुन जपमाळ जपल्याने आयुष्यात प्रगती होत नाही, असे मानले जाते.
जपमाळ जपताना मधल्या बोटाचा वापर करावा. मणी बदलण्यासाठी तुम्ही अंगठा वापरावा.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही