ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकजण संपूर्ण शाकाहारी असतात.
ते अंडी सुद्धा खात नाहीत.
पण तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही रोज खात असलेले काही पदार्थ शुद्ध शाकाहारी नसतात.
जेलीमध्ये वापरले जाणारे जेलॅटिन हे प्राण्यांच्या हाडांपासून, कातडीपासून किंवा स्नायूंपासून बनवले जाते.
काही चीजप्रकारांमध्ये वासरांच्या पोटात सापडणारा रेनेट हा घटक वापरला जातो.
आईसक्रिममध्ये सुद्धा जेलॅटिन किंवा अंड्यामधील पिवळे बलक वापरले जाते.
काहीप्रकारच्या सॉसमध्ये लहान मासे वापरले जातात.
लहान मुलांना आवडत असलेल्या कँडी किंवा लॉलीपॉपमध्ये ग्लेझिंगसाठी किटकांपासून बनवलेला पदार्थ वापरला जातो.
काही प्रकारच्या ब्रेडमध्ये अंडी वापरली जातात.