Manasvi Choudhary
प्रत्येकाला चेहऱ्यावर ग्लो हवा असतो. चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी महिला अनेक उपाय करतात. परंतू तुम्हाला माहितीये का तुम्ही काही ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.
ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने त्वचेचे आरोग्य सुधारते आणि त्वचा तेजस्वी दिसते.
नियमितपणे ४ ते ५ बदाम खाल्ल्याने त्वचा उजाळते. बदाममध्ये व्हिटॅमिन ई चे प्रमाण अधिक असते ज्यामुळे त्वचेल आतून पोषण मिळते.
अक्रोडमध्ये ओमेगा - ३ फॅटी अॅसिड मुबलक प्रमाणात असते जे त्वचेची लवचिकता वाढवते ज्यामुळे त्वचा मजबूत आणि तरूण दिसते.
काजूमध्य तांबे असते जे त्वचेचा पोत सुधारते आणि त्वचा नैसर्गिकरित्या मऊ बनवते.
पिस्तामध्ये व्हिटॅमिन बी ६ असते जे त्वचेतील तेलाचे उत्पादन संतुलित करते आणि मुरूमे कमी करण्यास मदत करतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.