Sakshi Sunil Jadhav
वास्तुशास्त्रानुसार देवघर घराच्या योग्य दिशेला असणे महत्वाचे आहे.
हिंदू धर्मात देवघराला प्रचंड महत्वाचे स्थान दिले जाते.
देवघर हे योग्य दिशेला असणे महत्वाचे आहे.
कारण घरातील सकारात्मकता, सुख, दु:ख, समृद्धी आपण देवघरासमोर मांडतो.
कोणत्याही अडचणी आल्या तर लोक घरातल्या देवाऱ्याजवळ हात जोडतात.
आता आपण देवघर कोणत्या दिशेला असावे आणि का हे जाणून घेऊ.
ईशान्य दिशा ही देवघरासाठी योग्य मानली जाते.
कारण ही दिशा शांत, पवित्र तसेच देवांची दिशा मानली जाते.
पूजा करताना तोंड पश्चिमेला ठेवून पूर्वेकडे देवमूर्ती असाव्यात.