Dhanshri Shintre
तलाव हे निसर्गाचे सौंदर्य वाढवणारे आणि ताज्या पाण्याचा महत्त्वाचा स्त्रोत मानले जाणारे नैसर्गिक वरदान आहेत.
तलाव पाण्यातील जीवांसाठी आवश्यक असून ते पर्यावरण संतुलन राखतात आणि हवामान नियंत्रणात महत्त्वाची भूमिका निभावतात.
कॅनडा हा जगातील सर्वाधिक तलाव असलेला देश आहे, जिथे लाखो ताज्या पाण्याची नैसर्गिक तलावं पसरलेली आहेत.
कॅनडामध्ये तब्बल 8,79,800 हून अधिक तलाव असून, देशाच्या भूभागाचा मोठा हिस्सा या तलावांनी व्यापलेला आहे.
कॅनडातील असंख्य तलाव केवळ निसर्गसौंदर्य वाढवत नाहीत, तर ते देशासाठी ताज्या पाण्याचा महत्त्वपूर्ण आणि शाश्वत स्रोत ठरतात.
कॅनडाच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर रशिया आहे, जिथे सुमारे दोन लाख तलाव असून तेथील भूप्रदेशाला वैशिष्ट्यपूर्ण ओळख मिळते.
जगात तिसऱ्या क्रमांकावर संयुक्त राज्य अमेरिका आहे, जिथे अंदाजे एक लाख तलाव असून ते देशाला महत्त्वपूर्ण जलसंपत्ती प्रदान करतात.