Manasvi Choudhary
कावळा हा आपल्या आजूबाजूला, घरावर , झाडावर उडताना आपण सर्वानीच बघितला आहे. आपल्याकडे कावळा हा सामान्य पक्षी मानला जातो.
तुम्ही कधी विचार केला आहे का? कावळा हा एका देशाचा राष्ट्रीय पक्षी असू शकतो.
भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे, तसाच कावळा सुद्धा एका देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे.
भारताच्या शेजारील देशाचा राष्ट्रीय पक्षी कावळा आहे. यानुसार, भारताच्या शेजारी पाकिस्तान, अफगानिस्तान, चीन, बांग्लादेश, भूतान, श्रीलंका आणि म्यानमार हे देश आहेत.
तुम्हाला आश्चर्य वाटेल पण भूतान या देशाचा राष्ट्रीय पक्षी कावळा आहे.
भूतानमधील कावळ्याची एक प्रजाती रेवेन आहे. रेवेनचं वैज्ञानिक नाव Corvus Corax असं आहे ज्याला हिंदीमध्ये काला काग असं म्हणतात.
भूतानमध्ये रेवेन राजेशाही आणि अध्यात्मिक भक्तीचं प्रतीक मानले जाते.
भूतानमध्ये रेवेनला जारोंग डोंगचेन असं म्हणतात. जे सुरक्षा आणि शुभ संकेताचे प्रतीक मानले जाते.