Surabhi Jayashree Jagdish
अंडी आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जातात.
प्रोटीन आणि जीवनसत्त्वांनी भरलेली ही अंडी जगातील बहुतांश देशांमध्ये खाल्ली जातात.
जाणून घेऊया की जगातील कोणत्या देशांमध्ये सर्वाधिक अंडी खाल्ली जातात.
वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यूच्या एका अहवालानुसार, सर्वाधिक अंडी खाणाऱ्या टॉप १० देशांच्या यादीत नेदरलँड्स, चीन, मेक्सिको यांसारख्या देशांचा समावेश आहे.
संपूर्ण जगात सर्वाधिक अंडी नेदरलँड्समध्ये खाल्ली जातात. याठिकाणी प्रत्येक व्यक्ती सरासरी ३३.१ किलो अंडी खातो.
या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर हाँगकाँग आहे. याठिकाणी लोकांच्या आहारात अंड्यांपासून बनवलेल्या पदार्थांचा मोठा समावेश असतो.
चीनसारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशातही अंडी सर्वांच्या आवडीचे अन्न आहे.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भारताचाही सर्वाधिक अंडी खप असलेल्या टॉप १० देशांच्या यादीत समावेश आहे.