Manasvi Choudhary
पावसाळ्यात हलक्या आणि लवकर सुकतील अश्या साड्या महिला नेसतात. तुम्हाला देखील पावसाळ्यात साडी नेसायच्या असतील तर फिकट रंगाऐवजी पेस्टल शेड्स किंवा फ्लोरल प्रिंट्स साड्या नेसा.
पावसाळ्यात गडद रंगाची साडी नेसावी. पावसाळ्यात गुलाबी, निळा, पिवळा आणि हिरव्या या रंगाच्या साड्या उठून दिसतात.
पांढरा किंवा फिकट रंगाच्या साड्या पावसाळ्यात लवकर खराब होतात. तसेच या साड्या ट्रान्सपरंट असतात.
पावसाळ्यात साडीच्या रंगांसोबतच कापड महत्वाचे आहे. हलके आणि लवकर सुकणारे कापड पावसाळ्यात वापरावे.