Sakshi Sunil Jadhav
अनेकजणांच्या हातात धागा असल्याचं तुम्ही पाहिलचं असेल. ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरु आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक धाग्याचं विशेष महत्व असतं. तुम्ही तुमच्या गरजेनुसार धागा निवडू शकता.
पुढील माहितीत आपण कोणत्या रंगाचा धागा घातला पाहिजे आणि कशासाठी घातला पाहिजे हे जाणून घेणार आहोत.
लाल रंगाचा धागा साहस आणि शक्तीचं प्रतीक मानला जातो. मंगळ ग्रह मजबूत करण्यासाठी तुम्ही हा धागा वापरू शकता.
पिवळ्या रंगाचा धागा हा ज्ञान, बुद्धिमत्ता आणि अध्यात्माशी जोडलेला असतो. गुरू ग्रहाची कृपा मिळवण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता.
काळ्या रंगाचा धागा नकारात्मक शक्तींपासून संरक्षण करतो. शनी आणि राहूच्या अशुभ प्रभावांना कमी करतो.
हिरव्या रंगाचा धागा हा प्रगती, समृद्धी आणि शांततेचं प्रतीक मानला जातो. याने बुध ग्रहाचा अनुकूल प्रभाव वाढतो.
पांढऱ्या रंगाचा धागा हा मानसिक शांततेसाठी वापरला जातो. चंद्र ग्रह मजबूत करण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता.
केशरी रंगाचा धागा आत्मविश्वास आणि आध्यात्मिक शक्तीचं प्रतीक मानला जातो. याने सूर्य आणि गुरू ग्रहांची ऊर्जा वाढते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.