Car color effect: उन्हाळ्यात कोणत्या रंगाची कार जास्त तापते?

Surabhi Jayashree Jagdish

उन्हाळ्यात कार पटकन तापते

उन्हात उभी असलेली कार काही मिनिटांतच गरम होऊ शकते. यामध्ये कारच्या रंगाचाही फरक पडतो. कारण कारचा रंग तापमानावर परिणाम करतो.

black car heat | saam tv

गडद रंग

काळा, गडद निळा आणि गडद तपकिरी रंग सूर्याची उष्णता अधिक शोषतात. त्यामुळे अशा रंगांच्या कार लवकर तापतात. कारच्या आतील भागातही जास्त गरम वातावरण तयार होते.

white car cool | saam tv

काळ्या रंगाची कार

काळा रंग सूर्यप्रकाशातील उष्णता सर्वाधिक प्रमाणात शोषून घेतो. यामुळे काळ्या रंगाच्या कारमध्ये जास्त उकाडा जाणवतो. धूपात उभी असताना तिचे तापमान अधिक वाढते.

vehicle heating | saam tv

गडद निळी

फक्त काळाच नाही तर गडद निळा आणि गडद तपकिरी रंगही उष्णता खेचतात. अशा रंगांच्या कारचे बाह्य आणि अंतर्गत तापमान वाढते. म्हणून या कारही लवकर गरम होतात.

sun heat effect | saam tv

पांढऱ्या आणि सिल्व्हर रंगाच्या कार

पांढरा आणि सिल्व्हर रंग सूर्यकिरणं परावर्तित करतात. त्यामुळे उष्णता कमी प्रमाणात शोषली जाते.

यामुळे अशा कारमध्ये तुलनेने कमी गरमी जाणवते.

interior car heat | saam tv

इतर घटकांचाही परिणाम होतो

कारच्या काचा, पार्किंगची जागा आणि हवेची ये-जा यावरही तापमान अवलंबून असते. बंद जागेत उभी असलेली कार अधिक गरम होऊ शकते. म्हणून फक्त रंगच नाही तर इतर गोष्टीही महत्त्वाच्या आहेत.

car cooling tips | saam tv

सनशेडचा वापर

कार दीर्घकाळ उन्हात उभी असल्यास कोणत्याही रंगाची कार गरम होऊ शकते. अशावेळी सनशेडचा वापर केल्यास आतील उष्णता काही प्रमाणात कमी होते. यामुळे कारचे केबिन तुलनेने थंड राहण्यास मदत होते.

summer driving tips | saam tv

Kandivali Tourism: थंडीच्या दिवसात फिरण्याचा प्लान करताय? दूर नकोच, कांदिवलीतील ही ठिकाणं ठरतील बेस्ट ऑप्शन

Kandivali Tourism | saam tv
येथे क्लिक करा