Saam Tv
भारतात जेवणाच्या प्रत्येक पदार्थाच कांदा वापरला जातो.
कांद्याशिवाय भारतीय जेवण अपुर्ण राहू शकतं. पण तुम्हाला माहितीये का?
कांदा हा भारतातल्या काही शहरांमध्ये खाल्ला जात नाही. तसेच तिथल्या हॉटेल्समध्ये कांद्याचे जेवण दिले जात नाही.
जम्मू आणि काश्मिरच्या रियासी जिल्ह्यात कांदा खाल्ला जात नाही.
कटरा या भागात माता वैष्णोदेवीची यात्रा असते. त्यामुळे या धार्मिक वातावरणात सरकारने कांदा लसूण वापरण्यास बंदी घातली आहे.
हिंदू धर्मात कांदा लसूण हे तामसिक अन्न म्हणून ओळखतात. याउलट कटरा हे शहर सात्विक आणि शुद्ध वातावरण म्हणून ओळखतात.
कटरा या शहरामध्ये तुम्हाला किराणा किंवा भाजीपाल्याच्या बाजारातही कांदा मिळणार नाही.
कटरा या परिसरात तुम्हाला कांदा लसणाशिवाय तयार केलेले चवीष्ठ पदार्थ खायला मिळतील.खोबरेल तेल चेहऱ्याला लावल्याने कोणते फायदे होतात?