Blue Number Plate: कोणत्या गाड्यांना निळ्या नंबर प्लेट दिल्या जातात आणि का? वाचा त्यामागील खास कारणे

Dhanshri Shintre

नंबर प्लेट्स

रस्त्यावर विविध प्रकारच्या नंबर प्लेट्स असलेली वाहने तुम्ही नक्की पाहिली असतील.

पिवळ्या रंगाच्या नंबर प्लेट्स

सर्वसाधारणपणे, खाजगी वाहनांवर पांढऱ्या आणि व्यावसायिक वाहनांवर पिवळ्या रंगाच्या नंबर प्लेट्स वापरल्या जातात.

हिरव्या रंगाच्या नंबर प्लेट्स

इलेक्ट्रिक वाहनांसाठी विशेष हिरव्या रंगाच्या नंबर प्लेट्स देण्यात येतात, ज्यामुळे त्यांची ओळख वेगळी होते.

निळ्या रंगाची नंबर प्लेट

निळ्या रंगाची नंबर प्लेट तुम्ही पाहिली आहे का? जर नाही, तर आम्ही त्याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत.

कॉन्सुलर कर्मचारी

परदेशी दूतावास आणि कॉन्सुलर कर्मचाऱ्यांना निळ्या रंगाच्या नंबर प्लेट्स दिल्या जातात, ज्यामुळे त्यांची ओळख होते.

वेगळी ओळख

निळ्या नंबर प्लेटवर संख्या आणि अक्षरे पांढऱ्या रंगात लिहिलेली असतात, ज्यामुळे त्याची वेगळी ओळख होते.

विशेष सूट

या नंबर प्लेटच्या वाहनांना सामान्य कर नियमांपासून विशेष सूट मिळते, ज्यामुळे त्यांचा वेगळा दर्जा असतो.

वाहतूक नियम

या नंबर प्लेट असलेल्या वाहनांना वाहतूक नियमांत विशेष सवलत दिली गेली असून त्यांना काही नियमांपासून मोकळीक आहे.

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

NEXT: भारतातील टॉप सेलिंग इलेक्ट्रिक कारची बॅटरी रेंज किती आहे? कारचे फायदे काय?

येथे क्लिक करा