Manasvi Choudhary
हिवाळ्यात सर्वत्र थंडीचे वातावरण होते. या ऋतूत आरोग्याची योग्य काळजी घ्यावी लागते.
हिवाळ्यातील या थंडीचा थेट शरीरावर परिणाम होतो अनेकजण आजारी पडतात.
मात्र तुम्हाला माहितीये का? शरीराच्या कोणत्या भागाला सर्वात जास्त थंडी वाजते?
माहितीनुसार, शरीराच्या हात आणि पाय या अवयवांना सर्वात जास्त थंडी जाणवते.
नाक आणि कान देखील लगेच गार पडतात हे देखील माहित असावे.
जेव्हा जास्त थंडी पडते तेव्हा हात आणि पायांच्या रक्तवाहिन्या या आकुंचन पावतात यामुळे हात आणि पायाच्या दिशेने होणार रक्तप्रवाह कमी होतो.
हात आणि पायांना रक्तप्रवाह कमी झाल्याने हात , पाय वेगाने थंड होतात. हात आणि पायानंतर नाक आणि कान सर्वात जास्त थंड होतात याचे कारण म्हणजे हे शरीराचे अवयव खुले असतात जे बाह्य वातावरणाच्या संपर्कात लवकर येतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.