ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतिर्थावरुन गुढीपाडवा मेळाला घेतला.
गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रदुषित नद्यांवर भाष्य केले.
भाषणामध्ये ''सगळ्यात प्रदुषित नद्यां म्हणजेच मुळा-मुठा नदी, पवना आणि इंद्रायणी या आहेत'' असे त्यांनी स्पष्टपणे म्हंटले आहे.
कुंभमेळ्यात धर्माच्या नावाखाली गंगा नदी मोठ्या प्रमाणात प्रदुषित झाली असेही त्यांनी सांगितले.
तिथे स्वच्छतेसाठी ३३,००० कोटी रुपये खर्च करूनही गंगा नदीत स्नान केल्यानंतर हजारो लोक आजारी पडले.
महाराष्ट्रातील ५५ नद्या धोक्यात आहेत.
त्यामध्ये आता मुंबईची मिठी नदी पुर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
तुम्हाला माहितीच असतील मुंबईत एकूण ५ नद्या होत्या. त्यापैकी १ नदी उरली आहे.
मुंबईतील शेवटची नदी म्हणजेच मिठी नदी आहे.
मिठी नदी आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
भाषणात प्रदूषण नियंत्रण मंडळ काय करत आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.