ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लिव्हर आपल्या शरीराचा महत्वाचा अवयव आहे. लिव्हर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे आणि रक्त साफ करण्याचे काम करतं.
अनेकांना असे वाटते की, फक्त दारु प्यायल्याने लिव्हरला नुकसान होते. परंतु असेही काही गोष्टी आहेत. जे खाल्ल्याने लिव्हरवर परिणाम होतो.
हेल्दी लिव्हरसाठी कोणत्या गोष्टी खाऊ नयेत, जाणून घ्या.
जास्त प्रमाणात साखर असलेले पदार्थ खाण टाळा. कोल्ड ड्रिंक्स, पॅक्ड ज्यूस आणि प्रोसेस्ड फूड सारखे पदार्थ खाणं टाळा. यामुळे फॅटी लिव्हरचा त्रास होऊ शकतो.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही प्रकारची औषधं घेणं टाळा. वारंवार पेनकिलर, अँटीबायोटिक्स आणि स्लीपिंग पिल्स सारखी औषध खाणं टाळा.
बाहेरील तळलेले पदार्थ, पॅकेज्ड फूड आणि जंक फूड खाणं टाळा. यामध्ये प्रिजरव्हेटिव्ज असतात. ज्यामुळे लिव्हरला सूज येऊ शकते.
हेल्दी लिव्हरसाठी शरीराला हायड्रेटेड ठेवा. यासह, आहारात हिरव्या भाज्या, फळं आणि आवळ्याचा समावेश करा. फास्ट फूड आणि साखरयुक्त पदार्थ खाणं टाळा.