Sakshi Sunil Jadhav
हत्तीरोग झाल्यास रुग्णाच्या पाय, हात किंवा इतर अवयवांना खूप जास्त प्रमाणात सूज येते.
माणसाच्या पायाचा आकार हत्तीरोगामूळे बदलतो.
तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की, हत्तीरोग कोणत्या प्राण्यापासून परसतो का?
तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे हा रोग कोणत्याही प्राण्यामुळे पसरत नाही.
हत्तीरोग हा 'क्युलेक्स' (Culex) या प्रजातीच्या डासांमुळे पसरतो.
जेव्हा क्युलेक्स डास चावतात तेव्हा ते माणसाच्या रक्तात त्यांच्या शरीरातील परजीवी सोडतात. त्याने हा रोग होतो.
क्युलेक्स डास हे शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात.
'क्युलेक्स' डास संक्रमित व्यक्तीचे रक्त शोषून घेतात आणि नंतर ते निरोगी व्यक्तीला चावतात, ज्यामुळे हत्तीरोग पसरतो.