Sakshi Sunil Jadhav
सणावारांना घरामध्ये विविध पारंपारिक पदार्थ तयार केले जातात.
काही वेळेस पुऱ्या तयार केल्यावर पुऱ्यांमध्ये तेल शोषलं जातं आणि त्यांची चव बिघडते.
पारंपारिक पदार्थांमध्ये पुऱ्या आवर्जून केल्या जातात.
पुढे आपण पुऱ्या टम्म फुगण्यासाठी खास टिप्स जाणून घेणार आहोत.
कणकेत १ ते २ चमचे रवा किंवा गरम तेलाचे मोहन मिसळू शकता.
पुरी तळताना तेल व्यवस्थित तापवा आणि मध्यम ते हायच्या मध्ये पुरी तळा.
कणीक फार सैल मळू नका त्यामुळे पुऱ्या तेल पिऊ शकतात.
पुरीच्या पिठात पाणी ऐवजी दूध किंवा दही वापरल्याने पुरी कुरकुरीत होते आणि तेलकट होत नाही.
पुरी तळल्यानंतर ती लगेच किचन टिश्यूवर ठेवा, त्यामुळे अतिरिक्त तेल शोषले जाईल.