Sakshi Sunil Jadhav
तुम्हाला माहितच असेल, माणसापेक्षा प्राण्यांमध्ये वास घेण्याची क्षमता सगळ्यात जास्त असते.
प्राण्यांमध्ये तुम्हाला वाटत असेल कुत्र्यांमध्ये वास घेण्याची क्षमता जास्त असते.
तुम्हाला वाटणारे हे उत्तर चुकीचे आहे. जाणून घ्या खरं उत्तर.
सगळ्यात जास्त वास घेण्याची क्षमता आफ्रिकन हत्ती (African Elephant) या प्राण्यात असते.
आफ्रिकन हत्तींच्या नाकात सुमारे २००० प्रकारचे वास घेण्याचे रिसेप्टर्स (olfactory receptors) असतात.
हत्ती आपल्या सोंडेच्या साह्याने अगदी 20 किलोमीटर दूरचा वास घेऊ शकतो.
हत्ती वास घेण्याचा उपयोग अन्न शोधण्यासाठी, इतर हत्तींच्या संवादासाठी, आणि संभाव्य धोक्यांपासून वाचण्यासाठी केला जातो.
२०१४ मध्ये झालेल्या एका जपानी संशोधनात सिद्ध झालं की आफ्रिकन हत्तींच्या नाकात सर्वात जास्त वास घेण्याची क्षमता असते.