Manasvi Choudhary
फळे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जातात. मात्र यासाठी फळे योग्य वेळी खाणे महत्वाचे आहे.
रात्रीच्या वेळी फळे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते की घातक? आणि रात्री कोणती फळे खाणे टाळावीत? हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
रात्री फळे खाल्ल्याने गॅस, पोट फुगणे, जळजळ होणे या पोटाच्या समस्या उद्भवतात. पचनक्रियेत अडथळा निर्माण होतो.
जर तुम्ही रात्री फळे खाऊन लगेच झोपलात, तर ती ऊर्जा वापरली जात नाही आणि रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते.
रात्रीच्या वेळी केळी, संत्री, सफरचंद, द्राक्षे आणि कलिंगड ही फळे खाणे टाळावे.
जर तुम्हाला रात्री भूक लागली असेल? फळ खायची इच्छा झाली असेल तर पपई हे फळ खा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.