Saam Tv
केसांच्या कोणत्याही समस्यांना आपण दुर्लक्ष केले तर त्यामुळे आपले नुकसान होऊ शकते.
तुम्ही जर बाजारातील केमिकल्सचे प्रोडक्ट्स वापरत असाल तर तुमचे केस अचानक गळायला लागतील.
काही वेळेस गळलेले केस पुन्हा येत नाहीत. अशा वेळेस तुम्ही पुढील नैसर्गिक वनस्पतींचा वापर करू शकता.
नैसर्गिक वनस्पतींच्या वापराने तुमचे केस अधिक दाट, सुंदर आणि वाढतील.
आयुर्वेदात भृंगराज तेल खूप महत्वाचे मानले जाते. त्याने केस वाढण्यासोबत ते पांढरे होत नाहीत.
तुम्हाला जाड चमकदार केस हवे असतील तर आवळ्याचे तेल किंवा मेहेंदीमध्ये आवळा पावडर आणि दही मिक्स करून लावू शकता.
मेथीचे दाणे केसातील कोंडा काढण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात.
तुम्ही केस धुण्याच्या अगोदर केसांचे कोणतेही तेल घ्या. त्यामध्ये मेथीचे दाणे भिजवून ठेवा. मग तेल लावा आणि हलका मसाज करा.
केस वाढवण्यासाठी सगळ्यात बेस्ट वनस्पती म्हणजे कडूलिंब आहे. ही पाने उकळवून ते पाणी केस धुताना वापरा. त्याने तुमचे केस नक्कीच वाढायला सुरुवात होईल.