Manasvi Choudhary
वास्तुशास्त्राप्रमाणेच फेंग शुईमध्येही घरातील गोष्टी योग्य दिशेला आणि योग्य जागी असणे महत्वाचे आहे.
फेंग शुईमध्ये घरातील घड्याळाचे स्थान खूप महत्वाचे मानले आहे.
घड्याळात केवळ वेळतच नाही तर सक्रिय ऊर्जा म्हणून पाहिले जाते असे मानले जाते की घरात घड्याळ योग्य ठिकाणी लावल्यास सकारात्मकता वाढवते.
यासाठी घरात चुकीच्या ठिकाणी घड्याळ लावू नये. तुम्हीही घरात घड्याळ लावण्याचा विचार करत असाल तर किंवा जुने घड्याळ बदलण्याचा विचार करत असाल तर महत्वाचे तीन नियम लक्षात ठेवा.
फेंग शुईनुसार, घराच्या पूर्व दिशेला घड्याळ ठेवणे शुभ मानले जाते. फेंग शुईमध्ये पूर्व दिशा नवीन सुरूवातीचे प्रतीक मानली जाते.
जर घरात पूर्व दिशेला जागा नसेल तर तुम्ही घड्याळ उत्तर दिशेला ठेवू शकता. उत्तर दिशा ही शुभ मानली जाते. फेंग शुईनुसार ही दिशा करिअर आणि संपत्तीसंबंधित आहे.
घड्याळ मुख्य दरवाजाजवळ लावू नये ही काळजी घेणे महत्वाचे आहे.
घरात तुटलेले, खराब झालेले घड्याळ ठेवू नये.
बंद घड्याळ घरात ठेवू नये. ते दुरूस्त करून घ्या.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.