Shraddha Thik
हे अजिबात नाकारता येत नाही की मालदीव हे भारतात राहणाऱ्या अनेक लोकांचे ड्रीम प्लेस होते.
मालदीवच्या प्रकारणानंतर अनेक लोकांनी मालदीव सोडून जगातील इतर देशांमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच अनेक देश आहेत जे भारतीयांना व्हिसा फ्री एंट्रीसह भरपूर प्रेक्षणीय स्थळे पाहण्याची ऑफर देत आहेत.
मलेशिया हे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे, जिथे तुम्हाला भेट देण्यासाठी 30 दिवसांचा मोफत व्हिसा सहज मिळू शकतो. हे शहर स्वादिष्ट खाद्यपदार्थ, उंच इमारती, शॉपिंग मॉल्स, बाजार आणि नाईट लाईफसाठी प्रसिद्ध आहे. येथे जाण्याचे फ्लाइटचे दरही जास्त नाहीत.
इतर देशांप्रमाणे, केनियानेही 1 जानेवारी 2024 पासून आपल्या देशात व्हिसा मुक्त प्रवेश केला आहे. वास्तविक, केनिया हा एक अतिशय सुंदर देश आहे, जो प्राचीन सभ्यतेपासून आधुनिक शहरांपर्यंत जैवविविधतेसाठी दूरवर प्रसिद्ध आहे.
जगातील सर्वात सुंदर बेटं पाहण्यासाठी इंडोनेशिया हा सगळ्यात सुंदर देश आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला इंडोनेशियाला भेट देण्यासाठी 30 दिवसांसाठी मोफत व्हिसा देखील मिळेल. इंडोनेशियामध्ये जावा-सुमात्रा आणि बाली समुद्रकिनारे खूप प्रसिद्ध आहेत, जिथे तुम्ही काही दर्जेदार वेळ घालवू शकता.
सेशेल्स हे हिंदी महासागरातील 115 उष्णकटिबंधीय बेटांनी बनलेले आहे, जगातील सर्वात सुंदर बेट देशांपैकी एक आहे. तुम्हाला मालदीवसारखे सौंदर्य अनुभवायचे असेल तर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत सेशेल्सला जाण्याचा प्लॅन करू शकता. तुम्ही सेशेल्समध्ये 30 दिवसांसाठी व्हिसा मुक्त प्रवेशासाठी देखील प्रवेश करू शकता.