Sakshi Sunil Jadhav
मुंबई हे फॅशनचे हॉटस्पॉट! इथे ट्रेंडी, स्टायलिश आणि बजेट-फ्रेंडली कपडे मिळणारी अनेक मार्केट्स आहेत. कॉलेज गर्ल्स असोत किंवा फॅशन लव्हर्स, स्वस्त आणि मस्त शॉपिंगसाठी ही मार्केट्स पहिली पसंती ठरतात. चला जाणून घेऊया मुंबईतील ८ बेस्ट शॉपिंग मार्केट्स, जिथे तुम्हाला ट्रेंडी कपडे आणि अॅक्सेसरीज अतिशय स्वस्त दरात मिळतील.
मुंबईतील सर्वात लोकप्रिय स्ट्रीट शॉपिंग स्पॉट हा लिंकिंग रोड आहे. ट्रेंडी कपडे, बूट्स, बॅग्स, अॅक्सेसरीज सगळं कमी दरात मिळतं. कॉलेज गोईंग मुलींसाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. टी-शर्ट्स, टॉप्स, जीन्स कमी दरात भरपूर व्हरायटीत मिळतील.
तब्बल 150 ते 300 पेक्षा स्टॉल्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील. टी-शर्ट्स, जीन्स, कॅज्युअल आणि पार्टीवेअर खूप स्वस्त दरात मिळतील. क्वॉलिटी चेक करणे महत्त्वाचे आहे.
ट्रेंडी टॉप्स, हँडबॅग्स, शूजचे सुपर कलेक्शन पाहायचे असेल तर हिल रोड शॉपिंग लेन बेस्ट पर्याय आहे. ईथे ट्रायलची सुविधा अनेक स्टॉल्सवर मिळते. कॉलेज आणि ऑफिस वेअर दोन्हीसाठी चांगले पर्याय मिळतील.
कपड्यांसाठी नव्हे तर लाइफस्टाइल आणि होम डेकॉरसाठी प्रसिद्ध हे मार्केट आहे. विणकामाच्या साहित्यापासून किचन आयटम्स, होम युटिलिटी, लायटिंग, डेकोर वस्तू मोठ्या प्रमाणात येथे उपलब्ध असतात.
अँटिक आणि विंटेज वस्तूंसाठी सर्वात बेस्ट जागा म्हणजे चोर बाजार. दिवे, फर्निचर, फ्रेम्स, विंटेज शोपीसेस अशा अनोख्या वस्तू थोड्या जास्त दरात पण वस्तू कुठेही न मिळणाऱ्या येथे मिळतील.
महिलांसह पुरुषांसाठीही उत्तम व्हरायटी, कपडे, शूज, फोन अॅक्सेसरीज पर्यंत या मार्केटमध्ये सगळं मिळतं. मुलांसाठीही खरेदीचे अनेक पर्याय येथे उपलब्ध आहेत.
मुंबईचा फॅशन पॅराडाईज, ऑक्सिडाईज्ड ज्वेलरी, बॅग्स, स्कर्ट्स, श्रग्स, टी-शर्ट्स, फॅशन शूटर आणि ब्लॉगर मुलींसाठी बेस्ट लोकेशन हे कुलाबा कॉजवे आहे.
पारंपरिक ड्रेस, साड्या, लेहेंगा, फॅन्सी सूट्स, लग्नसमारंभासाठी बजेट-फ्रेंडली शॉपिंगसाठी हे ठिकाण बेस्ट आहे. फॅब्रिकपासून तयार कपड्यांपर्यंत सगळे कपडे तुम्हाला इथे कमी दरात मिळतील.