Saam Tv
भारतातल्या प्रत्येक मंदिरात विविध नियम आणि कायदे आहेत.
त्यातीलच एका मंदिराबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
जिथे तुम्हाला देवाचे दर्शन घेण्यासाठी ४१ दिवस व्रत पाळावे लागते.
सबरीमाला हे या मंदिराचे नाव आहे. इथे तुम्हाला ४१ दिवसाचे व्रत पाळणे अनिवार्य आहे.
केरळमधल्या या मंदिरात प्रवेश करण्यापुर्वी भाविकांना मंडलम व्रताचे पालन करावे लागते.
मल्याळममध्ये वृश्चिक मास महिन्यात हा उपवास केला जातो.
या उपवासात तुम्हाला फक्त शाकाहारी अन्न खाण्याची मुभा असते.
तुम्हाला कोणत्याही व्यसनांपासून आणि वाईट सवयींपासून लांबच राहावे लागते.