Saam Tv
बटाट्याच्या साली, तांदळाचे पीठ, तेल, मीठ, लाल तिखट, चाट मसाला, हळद, लसुण पावडर इत्यादी.
बटाट्याच्या साली स्वच्छ धुवा आणि त्यातील ओलसरपणा काढण्यासाठी किचन टॉवेलने पुसून घ्या.
एका बाउलमध्ये बटाट्याच्या सालींमध्ये तांदळाचे पीठ, तेल, मीठ, लाल तिखट, हळद, आणि लसूण पावडर घालून चांगले मिक्स करा.
तेल गरम करून १०-१२ मिनिटे कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करा त्या साली फ्राय करा.
डीप फ्राय करायचे असल्यास, तेल गरम करून मध्यम आचेवर सालींचे वेफर्स सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
तयार झालेल्या वेफर्सवर तयार मसाला आणि चाट मसाला भुरभुरा आणि गरमागरम वेफर्स सर्व्ह करा.
फर्स अधिक चविष्ट बनवण्यासाठी कसुरी मेथी, ओरेगॅनो किंवा मसाला मिक्स वापरू शकता.