Surabhi Jayashree Jagdish
छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र होते.
छत्रपती संभाजी महाराजांनी मुघलांच्या अगदी नाकीनऊ आणले. त्यामुळे बादशहा औरंगजेब संतापला होता.
औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना कपटाने पकडले आणि नंतर त्यांची निर्घृण हत्या केली.
मुघलांनी छत्रपती संभाजी महाराजांची नखं काढली, त्यांचे डोळे काढले आणि त्यांची जीभ कापली.
छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे मुघलांनी तुळापूर गावात भीमा नदीच्या काठावर फेकले होते.
छत्रपती संभाजी महाराजांची समाधी दोन ठिकाणी बांधलेली आहे. ज्यात भीमा नदीच्या काठी तुळापूर गावात समाधी बांधली आहे.
तुळापूरपासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या वडू बुद्रुक नावाच्या ठिकाणी संभाजींची दुसरी समाधी आहे. याठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
संभाजींचे मित्र कवी कलश यांचीही समाधी तुळापुरात आहे. हे ठिकाण पुण्यापासून 35 किलोमीटर अंतरावर आहे.