Saam Tv
डोंबिवलीत प्रसिद्ध खाऊ गल्ली मधुबन गल्ली म्हणजेच मधुबन टॉकीजजवळ आहे.
मधुबन खाऊ गल्ली ही फक्त खाण्यासाठीच नाही तर स्वस्तात कपडे. एक्सेसरीज आणि इतर वस्तुंसाठीही नावाजलेली आहे.
तुम्हाला डोबिंवली स्टेशनपासून पुर्वेकडे, रामनगर पुलाजवळ ही खाऊ गल्ली सापडेल.
ताज्या भाज्यांनी भरलेलं स्वादिष्ठ सॅंडविच तुम्हाला इथे फक्त ३० रुपयांत मिळेल.
गरमा गरम आणि स्वच्छ पद्धतीने तयार केलेले मावशींच्या हातचे वडापाव आणि खास चटणी तुम्हाला फक्त २० रुपयात मिळतील.
गोड प्रेमींसाठी खास स्पेशल कुल्फी लाडाची घट्ट मलईदार कुल्फी मिळेल.
गजानन वडापाव हा डोंबिवलीमधला फेमस वडापाव आहे.
तसेच तुम्हाला इतर वस्तु अगदी ५० रुपयांपासून विकत मिळतील.
तुम्हाला चपला अगदी ५० रुपयांपासून ते १००० रुपयांपर्यंत मिळतील.