Saam Tv
कोकणात नाश्त्याला तयार केले जाणारे घावणे हे अगदी जाळीदार आणि मऊ लुसलुशीत असतात.
घावणे बनवताना त्यांना जाळी पडली नाही तर त्याची चव बिघडते. पुढे आम्ही तुम्हाला कोकणात तयार केले जाणारे घावणे बनवण्याची योग्य आणि सोपी पद्धत सांगणार आहोत.
तांदळाचे पीठ १ कप, मीठ, पाणी २ कप, कांदा आणि तेल.
एका भांड्यात तांदळाचे पीठ, मीठ आणि पाणी हळूहळू मिसळून पीठ तयार करा.
पीठ चांगल पातळ फेटून घ्या. त्यांनतर १० मिनिटे पीठ झाकून ठेवा.
तुम्ही आता जाड तवा ते तापवा. त्यामध्ये गावी वापरले जाणारे भिडं असेल तर तुमचे घावणे परफेक्ट होतात.
आता गॅस फास्ट करा आणि कांदा घेऊन तेल तव्याला पसरवा.
एक वाटी घ्या. त्यामध्ये पीठ घ्या आणि ते कडेकडेने टाकून मध्यभागी पसरवा, त्याने जाळी चांगली पडेल. दुसऱ्या बाजूने घावणे शेकवा आणि गरमा गरम घावणे सर्व्ह करा.
आता गॅस स्लो करून त्यावर अर्धा मिनिटे झाकण ठेवा. मग सुरीने कडा काढून दुसऱ्या बाजूने शेकवा. आणि घावणे सर्व्ह करा.