Surabhi Jayashree Jagdish
मोरपिस भगवान कृष्णाशी जोडलेले आहे, त्यामुळे धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून त्याला विशेष महत्त्व दिले जाते.
या वर्षी १६ ऑगस्ट रोजी कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. चला तर जाणून घेऊया, वास्तुशास्त्रानुसार घरात मोरपिस ठेवण्याचे काय फायदे आहेत.
पूजाघरात मोरपिस ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. यामुळे मनाला शांती मिळते आणि कुटुंबात सुख-समृद्धी नांदते.
तिजोरी किंवा कपाटात मोरपिस ठेवले, तर धनवृद्धी होते. आर्थिक अडचणी दूर होतात आणि घरात सदैव भरभराट टिकून राहते.
घराच्या प्रवेशद्वारावर मोरपिस लावणं अत्यंत शुभ मानलं जातं. यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकत नाही आणि कुटुंबात आनंद व सौहार्द टिकून राहते.
बेडरूममध्ये मोरपिस ठेवल्यास दांपत्य जीवनात प्रेम व सामंजस्य वाढते. नातेसंबंधांमध्ये गोडवा राहतो आणि पती-पत्नीमध्ये भांडण-कलह होत नाही.
मुलांच्या अभ्यासाच्या टेबलवर किंवा स्टडी रूममध्ये मोरपिस ठेवले, तर एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते. हे अभ्यासात यश मिळवण्यासाठीही उपयुक्त ठरते.