Surabhi Jayashree Jagdish
'अटकेपार झेंडे लावले' ही म्हण मराठा साम्राज्याच्या, विशेषतः पेशव्यांच्या पराक्रमाशी संबंधित आहे.
मराठ्यांनी आपल्या साम्राज्याचा प्रचंड विस्तार केला आणि दूर प्रदेशांवर आपली सत्ता स्थापन केली, त्याचं प्रतीक म्हणून ही म्हण वापरली जाते.
'अटक' हे सध्याच्या पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात असलेले एक ऐतिहासिक शहर आहे. हे शहर सिंधू नदीच्या काठी वसलेले आहे.
थोरले बाजीराव पेशव्यांनी आपल्या २२ वर्षांच्या पेशवाईत मराठा साम्राज्याचा प्रचंड विस्तार केला. त्यांनी उत्तरेकडील अनेक राज्यांवर विजय मिळवला आणि दिल्लीपर्यंत धडक मारली. त्यांच्या पराक्रमामुळेच अटकेपार झेंडे लावले या म्हणीचा पाया रचला गेला असं मानलं जातं.
घुनाथराव पेशवे यांच्या नेतृत्वाखालील मराठा सैन्याने १७५८ मध्ये लाहोर जिंकलं आणि नंतर अटकपर्यंत मजल मारली. त्यांनी अटकेच्या किल्ल्यावर मराठ्यांचा झेंडा फडकावला.
ही घटनाच अटकेपार झेंडे लावले या म्हणीच्या जन्माचे मुख्य कारण मानली जाते.
मराठा सैन्याने त्यावेळी सिंधू नदी ओलांडून पेशावरपर्यंतही काही काळ आपला अंमल बसवला होता.