Surabhi Jagdish
शास्त्रज्ञांनी केलेला एक नवीन संशोधन केलं असून आपल्या आकाशगंगेमध्ये 100 पेक्षा जास्त ब्लॅक होल्सचा झुंड फिरतोय.
Palomar 5 नावाच्या स्टार क्लस्टरमध्ये 100 पेक्षा जास्त ब्लॅक होल्स अस्तित्वात आहेत.
ही आकाशगंगा किती मोठी आहे जी 30,000 प्रकाश वर्षांमध्ये पसरलेली असून हा समूह पृथ्वीपासून सुमारे 80,000 प्रकाशवर्षे दूर आहे.
स्टार क्लस्टर्स अत्यंत दाट आहेत शास्त्रज्ञ अशा समूहांना 'जीवाश्म' मानतात. ज्यामध्ये सुमारे एक ते 1 दशलक्ष जुने तारे आहेत.
सायन्स अलर्टच्या अहवालानुसार, आकाशगंगेमध्ये सुमारे 150 ज्ञात गोलाकार ताऱ्यांचा समूह आहे.
शास्त्रज्ञांनी पालोमर 5 वर अभ्यास केला आणि असं समजलं की, पालोमार 5 च्या आत ब्लॅक होल्सचा समूह असेल तर ते आपण पाहतो त्यासारखं असू शकतं.
शास्त्रज्ञांचे मत आहे की, क्लस्टरच्या एकूण वस्तुमानाच्या 20 टक्के पेक्षा जास्त ब्लॅक होल आहेत, जे सुपरनोव्हाच्या स्फोटाने तयार झाले आहेत. अशा स्थितीत हा क्लस्टर एक अब्ज वर्षांत नष्ट होऊ शकतो.
चंद्रावर अनेक ठिकाणी पाणी? शास्त्रज्ञांना मिळाले खास संकेत