Sakshi Sunil Jadhav
दगडूशेठ हे मीठाचे व्यापारी होते. पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचे देहावसान झाले.
त्या घटने पत्नी सौ. लक्ष्मीबाई हे दोघेही दु:खी झाले. तेव्हा गुरु श्री.माधवनाथ महाराजांनी सांगितले की, आपण काही काळजी नका, आपण एक दत्ताची आणि एक गणपतीची मूर्ती तयार करू आणि त्याची रोज पूजा करू.
ही दोन दैवते आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा. भविष्यात जसे आपले अपत्य आपल्या मातापित्यांचे नाव उज्ज्वल करते. त्याचप्रमाणे ही दोन दैवते तुमचे नाव उज्वल करतील.
महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेटजींनी दत्ताची एक संगमरवरी मूर्ती व गणपतीची मातीची मूर्ती बनवून घेतली.
या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती.
गणपतीची ही पहिली मूर्ती शुक्रवारी पेठेतील अकरा मारुकी मंदिरात ठेवलेली आहे. तिची नित्य नियमाने आजही पूजा केली जाते.
सन १८९६ साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार करण्यात आली व तिचा उत्सव होऊ लागला.
सन १९६७ साली दगडूशेठ हलवाई गणपतीच्या अमृत महोत्सवानिमित्त गणेशाची नवीन मूर्ती तयार करुन घेतली.
दगडूशेठ गणपती ही मूर्ती कर्नाटकातील प्रसिद्ध शिल्पकार श्री. शिल्पी यांनी तयार केली आहे. हा इतिहास सोशल मिडीयावर देण्यात आला आहे.