ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी पिणे खूप महत्वाचे आहे. एका दिवसात कमीत कमी ८ ते १० ग्लास पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत करते.
परंतु तुम्हाला माहित आहे का, जेवल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये.
जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने पचनक्रिया मंदावते.
पाणी पाचन एंग्झायम सौम्य करते. ज्यामुळे पचनक्रियेवर परिणाम होतो.
यामुळे गॅस, अॅसिडिटी, आणि पोट दुखीचा त्रास होऊ शकतो.
जेवल्यानंतर अर्ध्या किंवा एका तासाने पाणी प्यायले पहिजे. यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते.