ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुमच्या घरात येणाऱ्या सिलिंडरचाही एक एक्सपायरी डेट म्हणजेच शेवटची तारीख आहे.
एकस्पायरी डेटच्या नंतरही सिलिंडर जर वापरात असेल तर स्फोट होण्याचा धोका वाढतो.
सिलिंडरवर लिहिलेल्या कोडमुळे तुम्हीही तुमच्या सिलिंडरची एकस्पायरी डेट ओळखू शकता, कसं जाणून घ्या.
सिलिंडरच्या वरच्या भागात नंबर आणि अक्षर लिहिलेले असते. ज्यामुळे सिलेंडरची एकस्पायरी डेट ओळखता येते.
सिलिंडरवर इंग्रजीमध्ये A, B, C, D असे अक्षर, आणि अंक म्हणजेच वर्ष लिहिलेले असतात. जे महिने आणि वर्षाचा कालावधी दर्शवतात.
A म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. B म्हणजे एप्रिल, मे, जून
C म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. तर D म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर असा अर्थ होतो.
जर सिलिंडरवर D26 लिहिलं असेल तर, D म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि वर्ष २०२६ ही या सिलिंडरची एक्सपायरी डेट आहे.