ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पुदिन्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, आयरन, मॅग्नेशियम आणि फोलेट सारखे पोषक तत्व असतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
अनेक जण पुदिन्याची चटणी, रायता किंवा लिंबू आणि पुदिन्याचे डिटॉक्स वॉटर देखील पितात. परंतु तुम्हाल माहित आहे का, फक्त पुदिन्याचे पाणी प्यायल्याने देखील जबरदस्त फायदे होतात.
रात्री झोपण्यापूर्वी पुदिनाच्या पानांना स्वच्छ धुवून पाण्यात भिजत ठेवा. आणि सकाळी हे पाणी प्या.
पुदिन्याचे पाणी प्यायल्याने गॅस, अॅसिडिटी आणि पोट दुखणे सारख्या समस्येपासून आराम मिळतो.
पुदिन्याचे पाणी प्यायल्याने त्वचेशी संबधित अनेक समस्या दूर होतात. आणि चेहरा चमकदार होतो.
उन्हाळ्यात पुदिन्याचे पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहते. आणि शरीराला थंडावा मिळतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.