ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
स्नॅक्समध्ये काही तरी टेस्टी आणि हेल्दी खावसं वाटतंय, मग ही झटपट होणारी पालक भजी रेसिपी नक्की ट्राय करा.
पालक, बेसन, लाल तिखट, ओवा, हळद, मीठ आणि तेल
सर्वप्रथम पालक स्वच्छ धुवून घ्या. शक्यतो लहान पाने असलेली पालक आणा.
बेसनच्या पीठात लाल तिखट, मीठ, ओवा, हळद आणि पाणी घालून पीठ थोडे घट्टसर भिजवा.
एका कढईत तेल गरम करा. पालकची पाने बेसनच्या पीठात घोळवून तेलात सोडा.
भजी छान कुरकुरीत आणि सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.
कुरकुरीत पालक भजी तयार आहे. संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये चहासोबत क्रिस्पी पालक भजीचा आस्वाद घ्या.