ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मुलांचे मोबाईलचे व्यसन त्यांच्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यासह मेंदूच्या विकासावरही परिणाम करतात.
मुलांची अतिप्रमाणात मोबाईल वापरण्याची सवय कशी सोडवाल, जाणून घ्या.
मोबाईलपासून लांब मुलांना मैदानी खेळ आणि फिटनेस सारख्या अॅक्टिव्हिटीमध्ये सहभागी करुन घ्या.
मुलांना दररोज जवळच्या उद्यानात घेऊन जा. जेणेकरुन ते त्यांच्या वयाच्या लोकांसोबत वेळ घालवतील.
जर तुमच्या मुलांना जेवण बनवण्याची आवड असेल तर त्यांना पाककला नक्की शिकवा. जी त्यांना भविष्यात कामी येईल.
मुलांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य राखण्यासाठी डान्स एक उत्तम पर्याय असू शकतो.
मुलांना वेगवेगळी पुस्तके वाचण्याची सवय लावा. यामुळे त्यांचे ज्ञान वाढण्यास मदत होईल.