Manasvi Choudhary
हिंदू धर्मात महाशिवरात्री या सणाला विशेष महत्व आहे.
आज रविवार १५ फेब्रुवारी २०२६ सर्वत्र महाशिवरात्री हा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. महाशिवरात्रीनिमित्त महिला व पुरूष उपवासाचे व्रत करतात.
महाशिवरात्रीचा उपवास हा साधारणपणे चतुर्दशी तिथी संपण्यापूर्वी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी सोडावा असं म्हटलं जाते.
सूर्योदयानंतर लगेच तुम्ही उपवास सोडू शकता. साधारणपणे सकाळी ६:४५ ते दुपारी २:०० वाजेपर्यंतची वेळ पारणासाठी उत्तम मानली जाते.
उपवास सोडताना एकदम जड किंवा तिखट जेवण करणे टाळावे सर्वात आधी कोमट पाणी किंवा लिंबू पाणी पिऊन शरीराला हायड्रेट ठेवा.
शंकराला अर्पण केलेले दूध, साखर किंवा एखादे फळ खाऊन उपवास सोडू शकता .
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.