Diabetes medication: सकाळी की रात्री? डायबेटीजची औषधं कधी घेतल्याने होतो फायदा?

Surabhi Jayashree Jagdish

मधुमेहाचं वाढलेलं प्रमाण

जगभरात आणि भारतात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढताना दिसतेय. भारतात कोट्यवधी लोक मधुमेहाने ग्रस्त असून देशाला 'डायबेटीस कॅपिटल' असंही म्हटलं जातं. विशेष म्हणजे आता हा आजार फक्त वृद्धांमध्येच नाही तर तरुण आणि मध्यमवयीन व्यक्तींमध्येही मोठ्या प्रमाणात आढळतो.

Diabetes causes | saam tv

मधुमेहाचं प्रमाण का वाढतंय?

आधुनिक जीवनशैलीमुळे शारीरिक हालचाल कमी झाली असून जास्त वेळ बसून काम करण्याची सवय वाढलीये. फास्ट फूड, साखरयुक्त पेयं आणि जास्त कॅलरीयुक्त आहारामुळे वजन वाढतं आणि इन्सुलिनचा परिणाम कमी होतो.

Metformin | saam tv

मधुमेहाची प्रमुख कारणं कोणती?

कौटुंबिक इतिहास असल्यास मधुमेह होण्याचा धोका अधिक असतो. लठ्ठपणा, विशेषतः पोटाभोवती वाढलेली चरबी यामुळे मधुमेह होण्याचा धोका अधिक वाढतो. याशिवाय उच्च रक्तदाब, वाढलेलं कोलेस्टेरॉल आणि व्यायामाचा अभाव यामुळेही मधुमेहाचा धोका वाढतो.

Blood sugar | saam tv

मधुमेहाची औषधं कधी घ्यावीत?

मधुमेहाची सर्व औषधं एकाच वेळी किंवा एकाच पद्धतीने घेतली जात नाहीत. काही गोळ्या नाश्त्यापूर्वी, काही जेवणानंतर तर काही रात्री झोपण्यापूर्वी घ्याव्या लागतात. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलेल्या वेळेनुसारच औषध घेणं अत्यंत आवश्यक आहे.

Diabetes prevention | saam tv

सकाळी औषध घेण्याचं महत्त्व

मेटफॉर्मिनसारखी काही औषधं अनेकदा सकाळच्या किंवा जेवणासोबत घेण्याचा सल्ला दिला जातो. ज्यामुळे रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यास मदत होतं आणि पोटाचे दुष्परिणाम कमी होऊ शकतात. सकाळी औषध घेतल्याने दिवसभरातील रक्तातील साखरेतील चढ-उतार नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते.

Insulin resistance | saam tv

रात्री औषध घेण्याची गरज कधी असते?

काही औषधं किंवा दीर्घकालीन प्रभाव असलेलं इन्सुलिन डॉक्टर रात्री घेण्याचा सल्ला देतात, जेणेकरून रात्री आणि सकाळच्या उपाशीपोटी साखरेवर नियंत्रण राहतं. काही रुग्णांमध्ये रक्तातील साखरेच्या पातळीनुसार रात्री औषध घेणं अधिक फायदेशीर ठरतं.

Diabetes symptoms | saam tv

औषधांबाबत कोणती काळजी घ्यावी?

मधुमेहाची औषधं नियमित आणि ठरलेल्या वेळी घेणं उपचारांचा महत्त्वाचा भाग आहे. डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधांचा डोस कमी-जास्त करणं किंवा औषध बंद करणं धोकादायक ठरू शकते.

Diabetes care | saam tv

टीप

ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Heart attack symptoms: 1 महिना अगोदर ही 5 लक्षणं दिसली तर समजा हार्ट अटॅक येणारे!

Cardiac arrest | saam tv
येथे क्लिक करा