ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ज्योतिषशास्त्रात चंद्रग्रहणाला विशेष महत्त्व आहे. २०२५ मधील दुसरे चंद्रग्रहण भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी होईल.
हे चंद्रग्रहण ७ सप्टेंबर २०२५ च्या रात्री सुरु होईल. हे पूर्ण चंद्रग्रहण असेल. ते भारतासह आशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया, अमेरिका यासारख्या देशांमध्ये दिसणार आहे.
ग्रहणाच्या ९ तास आधी सुतक काळ सुरू होतो. या काळात धार्मिक कार्य करु नये.
चंद्रग्रहणाच्या ९ तास आधी सुतक काळ लागतो अशावेळी कोणतेही धार्मिक कार्य करु नये.
ग्रहणाच्या वेळी मंत्र जप करावा. यावेळी पूजा-पाठ किंवा जेवण बनवू नये. तसेच अन्नाचे सेवन करु नये.
मान्यतेनुसार, ग्रहण काळात देवाचे नाव घेणे, मंत्रांचा जप करणे, हनुमान चालीसा किंवा श्रीमद् भागवत गीतेचे पठण करणे फायदेशीर आहे.