Sakshi Sunil Jadhav
कार्तिक महिन्यानंतर सुरू होणारा मार्गशीर्ष महिना हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो. भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना म्हणून या महिन्याला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. या काळात दर गुरुवारी महालक्ष्मी व्रत केल्यास संपत्ती, ऐश्वर्य आणि देवीची विशेष कृपा प्राप्त होतं असा अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये उल्लेख आढळतो. 2025 मध्ये मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात कधी आणि गुरुवारांच्या तारखा कोणत्या, याबाबत जाणून घ्या संपूर्ण माहिती.
पहिला गुरुवार हा 27 नोव्हेंबर 2025, दुसरा गुरुवार 04 डिसेंबर 2025, तिसरा गुरुवार 11 डिसेंबर 2025, चौथा गुरुवार 18 डिसेंबर 2025 असे चार गुरुवार असणार आहेत.
कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होते आणि हा महिना भगवान श्रीकृष्णाचा आवडता मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारांना महालक्ष्मी व्रताचे विशेष महत्त्व आहे.
महालक्ष्मी व्रतामुळे घरात संपत्ती, समृद्धी आणि सौभाग्य वाढतं असे मानले जाते. घरातील पैशाच्या समस्या दूर होतात.
प्राचीन धर्मग्रंथानुसार सत्ययुगाची सुरूवात मार्गशीर्ष महिन्यात झाल्याचा उल्लेख आहे. या महिन्यात भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीची एकत्र पूजा केल्यास लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद प्राप्त होतो.
व्रताची सुरुवात मार्गशीर्षातील पहिल्या गुरुवारी केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन होते. महिलांमध्ये या व्रताचे विशेष महत्त्व असल्याने अनेकजणी या दिवशी महालक्ष्मीची मनोभावे पूजा करतात.
मार्गशीर्ष गुरुवारी पूजा केल्याने घरातील वातावरणात सकारात्मकता आणि आनंद टिकून राहतो. 2025 मध्ये मार्गशीर्ष गुरुवारांच्या तारखा अनुक्रमे 27 नोव्हेंबर, 4, 11 आणि 18 डिसेंबर आहेत.
सूर्योदयानंतर लवकर उठून स्नान करा. पाटावर लाल कापड अंथरून तांब्याचा कलश ठेवा. मग त्यामध्ये पाणी, दुर्वा, सुपारी, नाणे ठेवा. मग लक्ष्मी देवीचा फोटो किंवा मुर्ती ठेवून विधीनुसार पूजा करा. शेवटी नैवेद्य दाखवून आरती करणा आणि कथा वाचा.