Death Signs: मृत्यूच्या २४ तासाआधी दिसणारी तीन प्रमूख लक्षणे जाणून व्हाल थक्क; तज्ज्ञांनी दिली माहिती

Sakshi Sunil Jadhav

मरणाची भीती

मृत्यूचे भय प्रत्येक माणसाला असते. मृत्यू ही अनिवार्य घटना असली तरी त्याबद्दल बोलणे अनेकांना अस्वस्थ करतं. मृत्यूची भीती, आयुष्य कमी होण्याची चिंता आणि जास्त जगण्यासाठीचे विविध प्रयोग यामुळे लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात.

death signs before 24 hours

नर्सने दिलेली माहिती

तुम्हाला माहितीये का? एक अनुभवी हॉस्पिस नर्सने मृत्यूपूर्व दिसणारी तीन सामान्य लक्षणे सांगत लोकांची भीती कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.

death signs before 24 hours

तज्ज्ञांचे मत

अमेरिकेतील हॉस्पिस नर्स जुली मॅकफॅडन यांनी गेल्या १६ वर्षांपासून मृत्यूशय्येवरील रुग्णांची सेवा करत आहेत. त्यांच्या अनुभवांवर आधारित ‘Nothing to Fear: Demystifying Death to Live More Fully’ हे पुस्तकही त्यांनी लिहिले आहे.

death signs before 24 hours

संवादात अचानक होणारे बदल

नर्स जुली सांगतात की मृत्यूच्या जवळ असलेले अनेक रुग्ण आपल्या कुटुंबीयांवरचे प्रेम, आभार आणि कधीमधी माफीही मागतात. हा भावनिक संवाद त्यांच्या शेवटच्या क्षणांचा महत्त्वाचा भाग असतो.

death signs before 24 hours

खास तारखेची वाट पाहणे

अनेकजण म्हणतात, “मी या तारखेनंतर जाईन” किंवा एखाद्या लग्न, वाढदिवसासारख्या प्रसंगानंतरच त्यांचा शेवट होईल, अशी भावना व्यक्त करतात. नर्स जुली यांच्या मते हे अनेक रुग्णांमध्ये पाहिले गेलेले सामान्य वर्तन आहे.

death signs before 24 hours

मृत्यूची जाणीव आणि शांतता

शेवटच्या २४ तासांत अनेकांना आपला मृत्यू जवळ आल्याची जाणीव होते. शरीर शांत होत जाते, बोलणे कमी होते आणि ते शांततेकडे वळतात.

death signs before 24 hours

मृत्यूची भीती का वाटते?

मानवाला स्वतःच्या मृत्यूची जाणीव असणे ही अनोखी गोष्ट आहे. संशोधनांनुसार १०% लोकांना ‘डेथ ॲन्क्झायटी’ जाणवते. वय, आरोग्य, मानसिक स्थिती आणि आयुष्याचा अर्थ जाणण्याची भावना या गोष्टी या भीतीवर परिणाम करतात.

death signs before 24 hours

डॉक्टरांनी दिलेला शेवटचा पर्याय

पॅलियेटिव्ह नर्सेस आणि डेथ डुला अशा व्यक्ती रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना या टप्प्यात मदत करतात. नर्स जुली यांच्या मते, मृत्यूच्या विषयाबद्दल बोलणे जितके सोपे होईल तितका लोकांचा तणाव कमी होतो.

death signs before 24 hours

NEXT: Leopard Facts: बिबट्या किती वर्षे जगतो?

leopard lifespan | saam tv
येथे क्लिक करा