Sakshi Sunil Jadhav
करवा चौथ हा येत्या १० ऑक्टोबर २०२५ शुक्रवारी साजरा केला जाणार आहे.
करवा चौथ हा दिवस विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी करतात.
करवा चौथमध्ये महिला दिवसभर उपवास करतात. उपवासाचा शेवट हा चंद्र पाहून केला जातो.
सकाळी ४.४५ ते ५.१५ पर्यंत तुम्ही उपासना करु शकता तर सायंकाळी ६.३० वाजता उपवास सोडू शकता.
काहीवेळेस हा उपवास अविवाहीत महिला चांगला नवरा मिळावा म्हणून करतात.
उपवासाची सुरुवात सरगी खावून केली जाते. त्यामध्ये अनेक पदार्थांचा समावेश असतो.
उपवासाच्या शेवटी सायंकाळी मातीच्या भांड्यात किंवा थाळीत दिवा, फळं, मिठाई, सुकामेवा आणि तांदूळ वापरुन पूजेचे पठण करुन करावा.