Saam Tv
यंदा चैत्र नवरात्री ३० मार्च रोजी असणार आहे. तर त्याचा शेवट ७ एप्रिल २०२५ ला होणार आहे.
चैत्र नवरात्रीच्या दिवशी हिंदू नववर्ष आणि गुढीपाडवा साजरा केला जातो.
या दिवशी देवीची उपासना केल्याने देवी प्रसन्न होते.
दुर्गादेवी ही सुख, आनंद, बळ, धन-संपत्तीची देवी असल्याचे मानली जाते.
चैत्र नवरात्रीच्या घटस्थापनेचा मुहूर्त ३० मार्चला सकाळी ६ वाजून १३ मिनिटांनी सुरू होणार आहे.
याची समाप्ती ३० मार्चला सकाळी १० वाजून १२ मिनिटांपर्यंत आहे.
दुपारी १२ वाजून १ मिनिटांपासून १२ वाजून ५० मिनिटांपर्यंत घटस्थापनेचा मुहूर्त असणार आहे.
तुम्ही तुमच्या मनातील इच्छा पुर्ण करण्यासाठी चैत्र नवरात्रीला देवीची उपासना करू शकता.
चैत्र नवरात्रीत अनेक ठिकाणी देवी शैलपुत्रीची पुजा केली जाते. हे देवीचे पहिले रुप आहे.