Surabhi Jayashree Jagdish
नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) ही अशी एक स्थिती आहे ज्यामध्ये जे लोक अजिबात दारू पित नाहीत त्यांच्या लिव्हरमध्ये चरबी जमा होते.
ही चरबी फॅटी लिव्हर डिसीजमध्ये बदलते आणि लिव्हरचं नुकसान करू लागतं.
कॅलरी आणि फॅट्स असलेलं अन्न आणि बैठी जीवनशैलीमुळे खेड्यांच्या तुलनेत शहरी भागात ही परिस्थिती गंभीर होते.
नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज सहसा सुरुवातीला कोणतंही नुकसान करत नाही, परंतु जर स्थिती बिघडली तर ते यकृताला गंभीर नुकसान पोहोचवू शकतं.
फॅटी लिव्हर डिसीज बहुतेकदा सुरुवातीच्या टप्प्यात कोणत्याही स्पष्ट लक्षणांशिवाय होतो.
काही सामान्य लक्षणांमध्ये पोटदुखी किंवा पोटाच्या वरच्या उजव्या भागात जडपणाची भावना यांचा समावेश आहे.
थकवा, पाय किंवा पोटात सूज येणं, कावीळ आणि भूक न लागणे हे देखील त्याची लक्षणे असू शकतात.
विनाकारण वजन कमी होणे, गोंधळ किंवा लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे ही देखील त्याची लक्षणे आहेत.